सातारा(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी,पांडुरंग लोहार
पाटण, महाराष्ट्र शासनाने सिलेंडर धारकांना राॅकेलबंदीचा घेतलेला निर्णयाचा निकष बदलून ग्रामीण भागासाठी वेगळा निकष लावावा भारत सरकारच्या गॅस योजनेतूळे ग्रामीण भागात ही गॅस सिलेंडर धारक झालेले आहेत पण सिलेंडर धारकांना राॅकेल बंदीच्या घेतलेल्या निर्णयामूळे ग्रामीण भागातील डोंगर दऱ्यातून राहणारे सर्वसामान्य जनतेला मात्र खूप त्रास होत आहे.
शहरी भागाचा विचार करता तेथे सौरऊर्जा किंवा सतत वीज यारखे पर्याय ऊपलब्ध असतात पण ग्रामीण भागात मात्र रोजच विजेचा लपंडाव सुरू असतो त्यात भारनियमन फटका यामूळे ग्रामीण भागातील जनतेला अंधारातच रात्रभर राहावे लागते. पाटण तालुक्याचा विचार करता हा पूर्णपणे डोंगरदरयातून वसलेला तालुका असल्याने महाराष्ट्राला वरदान ठरलेले कोयनाप्रकल्प तसेच पवनऊर्जा प्रकल्प या तालुक्यात असताना सुद्धा या तालूक्यात १२ तास भारनियमन असते म्हणजे माझ्यामूळे महाराष्ट्र खातोय रोटी भिजवून तुपाशी पण मी मात्र कायम ऊपाशी अशी अवस्था या तालुक्यात झाली आहे.
त्यात पाटण तालुका हा भूकंपग्रस्त म्हणून ओळखला जातो कोयना धरणासाठी लोकांनी केलेला त्याग या सर्व बाबीचा विचार करता शासनाने राॅकेलबंदीचा घेतलेला निर्णय व अंधारात तडपडणारी जनता यांचा विचार करता शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून किमान विज गेल्यानंतर कंदील लावता यावा एवढा तरी राॅकेल पुरवठा प्रत्येक कूटुंबाला करावा अशी मागणी ग्रामीण जनतेतून होत आहे.
शासनाने ग्रामीण भागासाठी वेगळा निकष लावावा त्यात पाटणचे आमदार शंभूराजे देसाई हे विधानसभेत धडाडीचे आमदार म्हणून ओळखले जातात.
मुख्यमंत्री यांचे जवळचे मिञ आहेत आ. शंभूराजे देसाई यांच्या कामांची धडपड या सर्व बाबीचा विचार करता आ.शंभूराजे देसाई हे किमान पाटण तालुक्यासाठी शासनाने केलेल्या राॅकेलबंदी निर्णयाचा निकष बदलून ग्रामीण भागासाठी प्रत्येक कूंटूबाला किमान २ लिटर तरी यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
शासनाने विचार करून सिलेंडर धारकांना राॅकेल बंदीचा घेतलेल्या निर्णायाचा निकष बदलून ग्रामीणभागास वेगळा निकष लावावा अशीमागणी ग्रामीण जनतेतून होत आहे.



















