नाशिक (निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.११.०५.२०२०
येवला- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्ष सोडून इतर सर्व विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, या निर्णयाचे आम्ही स्वागत करत असून परीक्षा न होणाऱ्या वर्गातील आमच्या विद्यार्थी बांधवांनी सदर परीक्षेसाठी जी फी भरलेली आहे तिचे काय? या बाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी नाशिक जिल्हा विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन धनगे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. ग्रामीण भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने हाताला काम नाही येत्या काळात महाविद्यालयीन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे आता ज्या वर्गांच्या परीक्षा होणार नाही त्यांचे परीक्षा शुल्क परत करावे किंवा पुढील परीक्षेसाठी राखून ठेवावे असे धनगे यांनी केलेल्या पत्रव्यवहारात म्हंटले आहे. परीक्षेदरम्यान संबंधित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना शासनाने सॅनिटायझर उपलब्ध करून घ्यावे अशीही विनंती त्यांनी शिक्षण विभागाला केली आहे.



















