सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी, धीरज जगताप
दि.२८.३.२०२०
फलटण- कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर साखरवाडी गावामध्ये औषध फवारणी केली असून गाव निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. ग्रामस्थ यांनी घरातच थांबून काळजी घ्यावी असे आवाहन सरपंच ग्रामसेवक पोलीस पाटील तलाठी तंटामुक्ती अध्यक्ष यांनी केले आहे. कोरोना विषाणू पार्श्वभूमीवर गावात निर्जंतुकीकरण औषध फवारणी करण्यात आली असून कोरोना संक्रमणाला परतवून लावण्यासाठी ग्रामस्थांनी घरामध्येच राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी व खराडेवाडी ग्रामपंचायतीस सहकार्य करावे असे आवाहन सरपंच व ग्रामसेवक यांचेसह सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.



















