नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क) प्रतिनिधी, कैलास गायकवाड
दि.४.१२.१९
येवला- हैद्राबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी प्रकरणाने संपुर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. अत्याचारात व खून करणाऱ्या या समाजविघातक आरोपीना तात्काळ फाशीची शिक्षा करावी अशी मागणी येवला तालुका विद्यार्थी संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यपाल भगतसिह कोशवारी नाशिक चे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना पत्र स्वरूपात निवेदन देऊन केली आहे. येवला व नाशिक जिल्हा विद्यार्थी संघटना या प्रकरणी व महाविद्यालयिन मुलींच्या सुरक्षेच्या मुद्यांवर मा.आयुक्त व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे विद्यार्थी संघटना सचिव सागर घोडेराव यांनी सांगितले. समाजामध्ये घडणाऱ्या अश्या घटना निंदनीय असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करत असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी पोलीस तसेच कायदे मित्र बनून काम करतील असे विद्यार्थी संघटनेचे रवी सोनवणे यांनी सांगितले निवेदनावर सागर घोडेराव, सागर वाघ, रवी सोनावणे, गोकुळ भागवत, कुणाल निकम, महेश दारुंटे, शुभम गुळवे, रवींद्र पाटील, अनिकेत भोसले, मयूर सोनावणे, रश्मी पाटील, रोहिणी राऊत, अर्चना काळे, विजया शिंदे यांच्या सह्या आहेत.



















