सातारा(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०५.२०२०
महाबळेश्वर- कोरोनाच्या संकटाने सर्व जग हैराण झाले आहे.भारतात देखील कोरोनाचा दाह जाणवत आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉक डाऊन जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत अनेक लग्न सोहळे पुढे ढकलले गेले आहेत.अशातच महाबळेश्वर येथे राजाराम लक्ष्मण कांबळे यांची कन्या “दीपाली” हिचा विवाह (मंगल परिणय) गौतम सपकाळ यांचे चिरंजीव “निखिल” (वाई) यांच्याशी मोजक्याच नातलगांच्या उपस्थितीत,कोणताही बडेजाव न करता,सुरक्षेचे सर्व नियम पाळत,सोशल डिस्टनसिंगचे पालन करून,बौद्ध पद्धतीने विधीवत पार पडला. या मंगल परिणयास बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांची लक्षणीय उपस्थिती लाभली.बौद्धाचार्य आनंदा गायकवाड व किरण शिंदे यांनी परिणय विधी पार पाडला.येत्या काळात असेच मंगल परिणय विधी लावणे ही काळाची गरज आहे असेच काहीसे विचार उपस्थितांनी व्यक्त केले.या विवाहाची चर्चा सर्व शहरात होत असून सर्व स्तरातून कौतुक होत आहे.कोरोनाच्या कालावधीत जिल्ह्यात पहिला विवाह सोहळा पार पडण्याचा मान महाबळेश्वर च्या नावावर नोंदला गेला.



















