सातारा (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.२.२०२०
फलटण- स्थानिक व प्रकल्पग्रस्तांना कोणतेही सूचना न देता मंदीच्या नावाखाली कामावरुन काढून टाकल्याने तसेच स्थानिक व प्रकल्प ग्रस्तांना कामावर घ्यावे अन्यथा कंमिन्स कंपनी समोर उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडणार असल्याचे सुरवडी रेल्वे व औद्योगिक वसाहत सेवा भावी संस्थेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. कंमिन्स इंडीया लिमिटेड सुरवडी येथे सुरवडी, नांदल, ढवळेवाडी येथिल लोकांनी आपल्या जमिनी देऊन कंमिन्स इंडीया लिमिटेड कंपनी उभी राहीली आहे. कंमिन्स कंपनी मात्र स्थानिक व प्रकल्पग्रस्तांची विविध प्लॅटमधे प्रकल्प ग्रस्तांची मुले कामावर होती या मुलांना मंदीच्या नावाखाली कामावरुन कमी करुन त्यांच्या जागी नविन मुले नेमण्यात आली. स्थानिक व प्रकल्प ग्रस्तांना कंपनीत नोकरी देणे औद्योगिक विकास महामंडळ यांचा आदेश असताना कंपनीचे अधिकारी स्थानिक व प्रकल्प ग्रस्तांना योग्य वागणूक न देता त्याच्यांशी उध्दट वर्तन करत असल्याने कंपनी संबंधित प्रकल्प ग्रस्तांवर अन्याय होत आहे. या बरोबरीने कंपनीचे विविध कामे स्थानिक व प्रकल्पग्रस्तांना टाळून बाहेरील लोकांना दिले जात आहे. यामुळे स्थानिक सुशिक्षित तरुणावर बेरोजगारीची वेळ आणली जात आहे. तरी कंपनीची विविध कामाचे कंत्राट बाहेरील लोकांना न देता स्थानिक व प्रकल्प ग्रस्तांना द्यावे. कंत्राट पध्दतीने घेतलेल्या स्थानिक व प्रकल्पग्रस्तांना कामावर घेऊन त्यांना कामाचा योग्य मोबदला न देता त्यांची पिळवणूक कंपनी कडून होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाचे आठ दिवसात कंपनीने त्वरीत निर्णय न घेतल्यास कंपनी समोर प्रकल्प ग्रस्त व स्थानिक कुंटुबासह उग्र स्वरुपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा सुरवडी रेल्वे व औद्योगिक वसाहत सेवा भावी संस्थेच्या वतीने निवेदना द्वारे दिला आहे. या निवेदन विभागीय अधिकारी एम आय डी सी कोल्हापूर, जिल्हाधिकारी सातारा, पोलिस अधिक्षक सातारा, प्रांतधिकारी, तहसिलदार, फलटण पोलिस निरिक्षक यांना पाठविण्यात आले आहे.



















