सोलापूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१५.०५.२०२०
करमाळा- पंधरा टक्के निधीतुन अनुसुचित जाती जमातींना जीवनावश्यक वस्तू न पुरवल्याचा आरोप रिपाई (आ) चे नेते नागेश कांबळे यांनी केला आहे. कोरोनाच्या महाभयंकर प्राश्वभुमीवर प्रशासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या एकुण उत्पनाच्या १५% रकमेमधुन मागासवर्गीयांना वस्तु द्याव्यात जेणेकरून या लॉक डाऊन मध्ये त्यांना दिलासा मिळेल. अशा अर्थाची परिपत्रकं देखील शासनाने काढलेली आहेत. परंतु असे असताना देखील सोलापुर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती जाणुन बुजून टाळाटाळ करत आहेत. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८च्या कलम १४५(१)चे उल्लंघन होत असुन सदरिल १५%निधी खर्चात कसुर करणाऱ्या संबंधित ग्रामसेवक तसेच सरपंच यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपाई चे प .महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी केली असुन लवकरात लवकर कारवाई न केल्यास लॉक डाऊन मध्ये देखील संविधानातील कलम २१ तसेच कलम ४७ चा आधार घेत रिपाई (आ)च्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा कांबळे यांनी दिला आहे.



















