नाशिक(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,कैलास गायकवाड
दि.१२.१०.१९
येवला- ८४ व्या धर्मांतर घोषणा दिनी येवला मुक्तीभूमी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ऑक्टोबर १९३५ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी “मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मारणार नाही” अशी ऐतिहासिक क्रांतिकारी घोषणा येवला मुकामी दिली होती या घटनेला रविवार १३ ऑक्टोबर २०१९ रोजी ८४ वर्ष पूर्ण होत असून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन अनुयायी येवला मुक्तीभूमी येथे वंदन करण्यासाठी येत असतात. भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष मीराताई आंबेडकर अनुयायाना संबोधित करत असतात. यावेळी महानगर पालिका आणि विविध सामाजिक संस्था याच्या कडून अनुयायासाठी भोजन दान,चहा, पाणी आदीची सोय करण्यात येते. विशेष म्हणजे भीमा कोरेगाव सारखा गैर प्रकार घडू नये म्हणून पालिका प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला जाणार आहे.येवला- ८४ व्या धर्मांतर घोषणा दिनी येवला मुक्तीभूमी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी “मी हिंदू म्हणून जरी जन्माला आलो, तरी हिंदू म्हणून मारणार नाही” अशी ऐतिहासिक क्रांतिकारी घोषणा येवला मुकामी दिली होती या घटनेला रविवार १३ ऑक्टोबर २०१९ रोजी ८४ वर्ष पूर्ण होत असून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन अनुयायी येवला मुक्तीभूमी येथे वंदन करण्यासाठी येत असतात. भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष मीराताई आंबेडकर अनुयायाना संबोधित करत असतात. यावेळी महानगर पालिका आणि विविध सामाजिक संस्था याच्या कडून अनुयायासाठी भोजन दान,चहा, पाणी आदीची सोय करण्यात येते. विशेष म्हणजे भीमा कोरेगाव सारखा गैर प्रकार घडू नये म्हणून पालिका प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला जाणार आहे.



















