नाशिक(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०५.२०२०
येवला- जिल्ह्यात मालेगाव पाठोपाठ येवल्यातही रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनासह येवलेकरांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ३२ कोरोना बाधित रुग्नापैकी टप्याटप्या ने २९ रुग्ण औषधोपचाराने कोरोना मुक्त झाल्याने आता येवल्यातील रुग्णसंख्या अवघी चार राहिली आहे. तालुक्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याने प्रशासनासह येवलेकराना मोठा दिलासा मिळाला.
येवला येथील आरोग्य यंत्रणाच कोरिनाबधित झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. शहर व तालुक्यातील ३२ बाधित रुग्णांपैकी तब्बल २९ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून, आता तालुक्यात केवळ तीनच रुग्ण राहिले आहे. या तीन रुग्णावर नाशिक येथील जिल्हा रुग्णलयात उपचार सुरू असून उपचाराला या रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या बरोबरच काही दिवसात कोरोनाचा नवीन रुग्ण आढळून आल्याने येवल्यातील कोरोनाची संपर्क आखली खंडित करण्यास प्रशासनाला यश आले. २३ एप्रिल पासून येवला शहरात कोरोनाबधित रुग्ण संख्या झाली होती. या सर्व रुग्णांवर उपचार करण्यात येऊन २८ कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना टप्याटप्याने डिस्चार्ज देण्यात आला होता, तर काल एका कोरोणामुक्त रुग्णाला येथील कोविड केअर सेंटर व निर्धारित कोविड आरोग्य केंद्रात सद्यस्थितीला एकही रुग्ण नसल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक शैलजा कृपास्वामी यांनी दिली.



















