चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०५.२०२०
चंद्रपूर- चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील प्रभाकर बारोकर यांची अडीच वर्षाची मुलगी विहिरी शेजारी खेळत असताना खेळता खेळता तोल जाऊन तोल विहिरीत गेल्याने ती विहिरीत पडली जवळच असलेल्या तिच्या वडिलांनी मुलीला वाचविण्यासाठी विहिरीत उडी मारली दोघेही बुचकाळ्या मारू लागले तेव्हा गस्तीवर असलेले जिगरबाज जाबाज पोलीस शिपाई नागरगोजे ने हकीकत ऐकल्यावर तुरंत विहिरीत उडी घेऊन बाप लेकीचे प्राण वाचविले. शंकरपूर येथील प्रभाकर बारेकर वय २७ वर्ष हे त्यांची मुलगी अडीच वर्षाची शिवण्या सोबत विहिरी जवळ खेळत होते परंतु तिचा तोल गेल्याने विहिरीत पडली मुलीला। वाचविण्यासाठी पोहता येत नसले तरी मुलीच्या वडीलाने सुद्धा उडी घेतली विहिरिजवळ गर्दी जमली तेवढ्यात पोलीस गस्त मधील विनोद जांभुळे व परमेश्वर नागरगोजे आले गर्दी का जमली याची माहिती घेत तोच परमेश्वर नागरगोजे पोलीस यांनी ३५ फूट विहिरीतील १५ फूट पाण्यात उडी घेतली आणि विहिरीत बुचकाळ्यात असलेल्या बाप लेकीचे प्राण वाचवून बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेद्वारे नागभीड ला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.
लॉकडाऊनच्या काळात कायदा व सुवस्था ठेवण्यासाठी पोलीस गस्त ठेवीत असताना सुद्धा पोलिस नागरगोजे यांनी जीवाची पर्वा न करता कर्तव्याची जाण जागृत करून दिली त्यांच्या साहसी मुळे त्या बाप लेकीचे प्राण वाचले असून परमेश्वर नागरगोजे चे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.



















