सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जेएनयूच्या संशोधक विद्यार्थिनी नेहा बोरा यांचा विद्यार्थी संवाद
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२६.०८.२०२६
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आज, दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) येथील पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी तसेच ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
दुपारी १२ ते २ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक तसेच विद्यार्थी प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमापूर्वी नेहा बोरा यांनी विद्यापीठ परिसरातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना भेट देऊन अभिवादन केले.
तसेच विद्यापीठाच्या मुख्य इमारत परिसरात उभारण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवन व कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या शिल्पसृष्टीची पाहणी करून त्यामागील इतिहास व सामाजिक कार्याची सविस्तर माहिती जाणून घेतली.
विद्यार्थी संवादादरम्यान शिक्षण, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि विविध सामाजिक विषयांवर विचारांची देवाणघेवाण झाली. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांवर नेहा बोरा यांनी सविस्तर संवाद साधला.
या भेटीमुळे विद्यापीठातील विद्यार्थी आणि देशातील महत्त्वाच्या विद्यार्थी चळवळीतील प्रतिनिधी यांच्यात विचारांची देवाणघेवाण होऊन विद्यार्थी प्रश्नांवर संवादाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.



















