दापोडीत जागतिक टपाल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सन्मान
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१०.१०.२६
दापोडी- श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्या वतीने जागतिक टपाल दिनानिमित्त दापोडी टपाल कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजय कणसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जागतिक टपाल दिनाचे औचित्य साधून श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था, दापोडी यांच्या वतीने दापोडी टपाल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भारतीय टपाल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांना टपाल सेवा, आर्थिक सेवा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी टपाल विभागातील अधिकारी व कर्मचारी सातत्याने परिश्रम घेत असतात. दापोडी टपाल कार्यालयातील पोस्टमास्टर आरती पिसोळकर, अश्विनी शेवाळे, डोंगरे मॅडम, मदने डाक सहायक यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पिंपरी चिंचवड टपाल उपविभागाच्या खडकी मुख्यालयाचे जनसंपर्क डाक निरीक्षक नितीन बने यांचीही या प्रसंगी उपस्थिती होती.



















