कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल ज्युनियर कॉलेज पाटण मधील विद्यार्थ्यांच्या वाढदिवसा निमित्त शालेय साहित्याचे वाटप…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, चंद्रकांत सुतार
दि. २९.१०.२६
पाटण – कै.ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल ज्युनियर कॉलेज पाटण मधे इयत्ता ५ वीची विद्यार्थिनी कु.प्रांजली मुळे आणि इयत्ता ७ वीची कु.आराध्या शिंदे यांच्या च्या जन्म दिना निमित्त शाळेतील गरजू विद्यार्थिनी व विद्यार्थ्यी यांना मुख्याध्यापक श्री.बि.पी.देसाई, उपमुख्याध्यापिका सौ.एस्. ए.मोहिते, आदर्श व जेष्ठ शिक्षक श्री. गुरव सर आणि पर्यवेक्षक श्री.ए.ए. पवार आणि सामाजिक कार्यकर्ते व निर्भीड पत्रकार प्रतिनिधी श्री.चंद्रकांत सुतार इत्यादी मान्यवरांचे हस्ते वह्या वाटप करण्यात आले. अशा महत्त्वपूर्ण प्रसंगी जिवलग मैत्रीण कु.खदिजा सरफराज शेख.हिला विषेश निमंत्रीत करून मैत्रीचे ऋणानुबंध जोपासत वाढदिवस साजरा केला अशा अनोख्या वाढदिवसाचे सर्वत्र कौतुक होत असून सर्वस्तरातून शुभेच्छा सदिच्छा आणि आशिर्वादाचा वर्षाव होत आहे.



















