पुण्यात कॅम्प परिसरातील ‘बर्गर किंग’वर FDAची कारवाई; परिसरात खळबळ!
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि. १४.०८.२०२६
पुणे – पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या ‘बर्गर किंग’च्या आउटलेटवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडून कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर संबंधित आस्थापनाचे कामकाज बंद असल्याचे दिसून येत असून, ठिकाणी दुरुस्ती व देखभालीचे काम सुरू असल्याची सूचना लावण्यात आली आहे.
या कारवाईमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, FDAने नेमकी कोणत्या कारणास्तव ही कारवाई केली? संबंधित खाद्यपदार्थांच्या गुणवत्ता व स्वच्छतेबाबत काही त्रुटी आढळल्या का? याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता, साठवणूक आणि ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित नियमांचे पालन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे FDAच्या या कारवाईमागील नेमके कारण आणि अधिकृत माहिती समोर येणे गरजेचे आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेची चर्चा सुरू असून, FDAकडून अधिकृतपणे कोणती माहिती दिली जाते आणि पुढील कारवाई काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















