सांगली(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०६.२०२०
सांगली- बेथेलहेमनगर येथील माणुसकीला काळिमा फासणारे घटना घडली आहे. दिनांक २० जून रोजी बेतालमनगर येथे १० भटकी कुत्री व ३ मांजर विष देऊन हत्या करण्यात आली आहे. बेथेलहेमनगर येथून पिपल फॉर अनिमल्सला या संस्थेला या घटना बाबत माहिती मिळाली. त्यानुसार पिपल फॉर अनिमलसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक लकडे, संस्थेचे कायदेशीर सल्लागार श्री ऍड बसवराज होसगौडर व श्री मुस्तफा मुजावर (इन्साफ फौंडेशन व SPCA सदस्य ) यांनी घटना स्थळी जाऊन पाहिले असता १० भटकी कुत्री, ३ मांजर मृत अवस्थेत आढळून आले. या बाबत स्थनिक लोकांनी सांगितलले की या परिसर मध्ये राहणारे रॉबिन बेंजामिन काळे यांनी विष देऊन हत्या केल्याचे सांगितले. त्या प्रमाणे घटनेची माहिती घेऊन श्री अशोक लकडे यांनी महात्मा गांधी पोलीस स्टेशन येथे रॉबिन बेंजामिन काळे यांच्या विरुद्ध प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा १९६० कलम ११(१)(ग) व भारतीय दंड संहिता, कलम ४२९ कायदा अंतर्गत फिर्याद दिला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष पाटील यांनी करत आहेत.



















