सांगली(निर्भिड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी.
दि.०४.०७.२०२०
मिरज- येथील एरंडोली गावात सहा पाळीव कुत्र्यांना विषारी औषध द्रव्य खाण्यात घालून ठार मारण्याचा धक्कदायक घटना घडली आहे. या प्रकरणी आक्रमक भूमिका घेत पिपल फॉर अनिमलसचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री अशोक लकडे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. या बाबत अधिक माहिती अशी की एरंडोली गावातील कृष्णाजी पाटील यांनी सांगलीतील प्राणीमित्र अशोक लकडे यांना संपर्क करुन गावात सहा पाळीव कुत्र्यांना विषारी औषध खायला घालून हत्या करण्यात आली आहे त्वरित या सांगितल्याने. अशोक लकडे यांनी संस्थेचे विधी सल्लागार अॅड बसवराज होसगौडर व किरण नाईक यांना सदर घटनेची माहिती देऊन एरंडोली गावात गेले असता तिथे उपस्थित असणारे लोकांनी मयत कुत्री दाखवली. कुत्र्यांना जवळ जाऊन पाहिले असता विषारी द्रव्य खाऊन मेल्याचे निदर्शनास आले. या बाबत कोणी मारला, काय कारण आहे विचारले असता लोकांनी सांगितले की गावातील संपत आकाराम पाटील यांच्या शेतात कुत्री मक्का खातात म्हणून त्यांनी मारले असावे असं आमचा संशय आहे, असं त्यांनी सांगितले. यावरून सविस्तर माहिती घेऊन संशयित संपत आकाराम पाटील यांच्या विरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे प्राणी क्रूर कायदा व भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल केली आहे. या बाबत अधिक हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी करत आहेत.
” प्राण्यांनवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहे. प्राण्यांचे कायदे कडक करण्याची गरज आहे, असं मत संस्थेचे विधी सल्लागार अॅड बसवराज होसगौडर यांनी व्यक्त केले”.



















