सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२५.०८.२०२०
खंडाळा- शिरवळ नगरीचे सुपुत्र व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे नेते तसेच कोरोना काळात हजारो नागरिकांना मदत करणारे अनुप सूर्यवंशी यांची निवड भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी करण्यात आलेली आहे.ही निवड भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माजी आमदार योगेश आण्णा टिळेकर यांनी केली आहे.पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा चिटणीस पदी ही नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल सातारा जिल्ह्यातून भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच त्यांचे सहकारी बांधव नेतेमंडळी व हितचिंतक यांच्याकडून करण्यात आलेली आहे.
पक्ष स्थापने पासून आजपर्यत पक्षाशी एकनिष्ठ राहून सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रा मध्ये पक्ष तळा गाळापर्यत त्यांनी पोहोचविला गल्ली पासून दिल्ली पर्यततच्या नेत्यांशी व्यक्तिगत संबंध असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. कोरोनाच्या काळातही जिल्ह्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये कवारंटाइन करण्यात आलेल्या लोकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी त्याबाबत विशेष पाठपुरावा करीत प्रशासनास निदर्शनास आणून दिल्या होत्या. तळागाळापर्यंत जाऊन काम करणाऱ्या जिल्हा पातळीवर वरील नेत्याला राज्य पातळीवरील पदाची जबाबदारी दिल्याने त्यांनी स्वतः
समाधान व्यक्त केलेले आहे. या नियुक्ती बद्दल भारतीय जनता पार्टीने विश्वास ठेवल्या बद्दल त्यांनी पक्षाला धन्यवाद दिले.



















