चंद्रपूर (निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१७.०९.२०२०
◆ नागभीड पोलिस स्टेशन मधील तीन कर्मचारी व कृषी उत्पन्न बाजार समितीतील एक कर्मचारी यांना कोरोनाची लागण
चंद्रपूर- नागभीड तालुक्यात कोरोनाच्या निदानासाठी १६ सप्टेंबरपर्यत नागभीड तालुक्यात ३हजार ५७५ व्यक्तीची तपासणी करण्यात आली. तालुक्यात आत्तापर्यत १६६ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असून यातील १३२ व्यक्ती बरे झाले आहेत. तर ३३ व्यक्तीवर उपचार सुरू असून एक व्यक्ती मृत पावला आहे. तालुक्यात कोरोनाची लागण आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून हा आजार वाढतच आहे हा आजार पसरू नये म्हणून प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु नागभीड तालुक्यातील बिकली या गावातील एक व्यक्ती मूर्त पावला असून प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी कंबर कसली आहे. नागभीड पोलीस स्टेशन येथील तीन कर्मचारी कोरोना बधित निघाले असून पोलिस निरीक्षक मडामे यांनी पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले होते सर्व कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता बाकी कर्मचाऱ्यांची अहवाल निगेटिव्ह आले आहेत माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत एकाच दिवशी आरोग्य पथक ५०कुटुंबाची तपासणी करणार त्यासाठी स्वयंसेवक व्यक्तीला भत्ता सुद्धा मिळणार ही मोहीम तालुक्यात १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. यामध्ये अशा सेविका व लोकप्रतिनिधी मार्फत दिलेले दोन स्वयंसेवक या तिघांचा आरोग्य पथकात समावेश असणार नागभीड नगरपरिषद अंतर्गत ७७ तर ग्रामीण भागात ८९ वेक्ती कोरोना बाधित आहेत.



















