चंद्रपूर(निर्भिड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१९.०९.२०२०
चंद्रपूर- चिमूर तालुक्यातील आंबोली-आसोला मार्गावर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे हे खड्डे शेतकऱ्यानां व शेतमजुरांना व रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अपघातास आमंत्रण देत आहेत व मागील महिनाभरापासून या ठिकाणी अनेक अपघातही झाले आहेत, अनेक शेतकऱ्यांच्या बैलगाड्या त्या ठिकाणी फसलेल्या आहेत व या मार्गाने असोला, आंबोली, चिंचाळा, लावारी, बोरगाव वाकर्ला, येणे जाणे करीत असतात या खड्यांवर उपाययोजना करण्याकरिता सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालय चिमुर यांना निवेदनाच्या माध्यमातून कळविले होते व तीन दिवसांची मुदत देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र प्रशासनाने कोणतीही उपाययोजना केलेली नाही व त्याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे सम्यक विध्यार्थी आंदोलनाचे चिमुर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे यांच्या नेतृत्वामध्ये आंबोली आसोला मार्गावर खड्यांमध्ये बेशरम (मैदीच्या) झाडे लावून आंदोलन करण्यात आले व पोलीस सहाय्यक निरीक्षक पोलीस दुरक्षेत्र शंकरपूर यांच्या मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर व सार्वजनिक बांधकाम विभाग चिमुर यांना निवेदन पाठविण्यात आले. हे आंदोलन शांततेमध्ये सोशल डिस्टन चा वापर करून, मास्कचा वापर करूत आंदोलन करण्यात आले यावेळी परिसरातील शेतकरी, सुरेश गरमडे, कांशीरामजी चौरे मधूकरजी नागपुरे, मुरलीधरजी चुनारकर, सुधाकरजी राऊत चिंचाळा, नंदू ठाकरे, पंकज चन्ने असोला, निकेश खंडसंग आसोला, विजय माथने प्रमोद भसारकर, राकेश गायकवाड, संजय लाकडे,भोजराज गायकवाड वसंता चौरे उपस्थित होते.



















