रत्नागिरी(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क) प्रतिनिधी
दि.२२.१२.२०२०
रत्नागिरी- सडवली वाडीतील मुलीशी तुझे प्रेमसंबंध आहेत का, अशी विचारणा करत संशय घेत धारदार साधनाने फिर्यादीच्या अंगावर वार करीत दंडावर चावा घेऊन दुखापत केल्याप्रकरणी प्रणय दशरथ तुळसणकर (तुळसणी) याच्यावर देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी देवरुख पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबतची फिर्याद राज सुरेश कदम (तुळसणी) यांनी दिली आहे. यातील आरोपी व फिर्यादी हे दोघे एकाच वाडीतील आहेत. फिर्यादी राज याला प्रणय याने मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत वाडीतील एका मुलीशी तुझे प्रेमसंबंध आहेत का, अशी विचारणा केली. यातून प्रणयने प्रेम संबंधाबाबत राजवर संशय घेत त्याच्या गळ्याच्या खाली, डाव्या हातावर, डाव्या कमरेवर धारदार हत्याराने कमरेवर मारुन उजव्या हाताच्या मनगट व दंडावर चावा घेवून दुखापत केली.



















