सांगली(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.१२.२०२०
मिरज- सूर्यास्तानंतर अवकाशातील एक खास अशी खगोलशास्त्रीय घटना पाहण्याची संधी खगोलप्रेमींना मिरज महाविद्यालय मिरज येथे लांब पल्ल्याच्या दुर्बिणीतून २० डिसेंबरला पाहायला मिळाली. सोमवारी सूर्यास्तानंतर उघड्या डोळ्यांनी गुरु-शनी या ग्रहांची महायुती दाखविण्यात आली. अवकाशप्रेमींसाठी हा खास क्षण होता .यामध्ये आपल्या सौर मंडळाचे दोन मोठे ग्रह, गुरू (jupiter) आणि शनी (saturn) एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. सगळ्यात विशेष म्हणजे हे दोनही ग्रह याआधी १७ व्या शतकात खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या काळात इतके जवळ आले होते. पण गुरू हा ग्रह त्याच्या जवळ असणाऱ्या शनि ग्रहाजवळ प्रत्येक २० वर्षानंतर जातो. पण या ग्रहांचं आता जवळ येणं खूप विशेष आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांच्या अंदाजे या दोन ग्रहांमधील अंतर फक्त ०.१ डिग्री असेल. जर हवामान अनुकूल असेल तर सूर्यास्तानंतर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही हे ग्रहांचं मिलन पाहू शकता. लांब पल्ल्याच्या दुर्बिणीतून गुरू या ग्रहाचे चार उपग्रह देखील दाखविण्यात आले. या दुर्मिळ घटनेचा लाभ यशवंत शिक्षण संस्थेचेआणि चेअरमन माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. ए. पाटील सर, उपप्राचार्य माणिकराव पाटील सर, पदार्थविज्ञान विभाग प्रमुख डॉ यादव मॅडम, मोरे सर, सांगली मिरज परिसरातील नागरिकांनी घेतला.



















