सांगली(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१२.०२.२०२१
सांगली- मकर संक्रात या सणाच्या वेळेस महाराष्ट्र, गुजरात मध्ये मोठया प्रमाणात पतंग मोहत्सव दर वर्षी भरवली जाते. पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या प्लॅस्टिक किंवा कृत्रिम रितीने बनविलेल्या मांजामुळे पक्षी, प्राणी व मानव जिवितांस इजा पोहचली जाते, काही प्रसंगी त्या इजा प्राणघातक ठरतात. पतंगासह तुटलेल्या नायलॉन मांजा बर्याच ठिकाणी झाडावर, विधुत तारांवर तसेच जमीनवर तर नाल्यात आढळून येतो. सदर नायलॉन मांजा लवकर विघटन होत नसल्याने पर्यावरणच्या दृष्टीने अधिकच घातक ठरतो. कित्येक लोकांना नायलॉन मांजामुळे गळा चिरून गंभीर जखमी, मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय हरित न्यायालय (National Green Tribunal ) २०१७ रोजी आदेश दिले आहे की, सर्व राज्यातील सरकारनी नायलॉन मांजा बॅन करावा. त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने २०१५ साली पर्यावरण (संरक्षण) कायदा, १९८६ चे कलम ५ व १५ अनुसार नायलॉन मांजाची विक्री, साठवणूकवर प्रतिबंध केला आहे. पतंगाचा मांजा विकणारे दुकानदार, पुरवठादार आणि वापर करणारे यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे मा.उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे आदेश आहे. महाराष्ट्रतील जळगाव, अहमदनगर या ठिकाणी पोलीस, वन विभाग नायलॉन मांजा विक्री करणारे दुकानदार कारवाई करत आहेत.पण अध्यप सांगलीसह इतर जिल्ह्यात कडक कारवाई होताना दिसत नाही. सांगलीचे जिल्हा अधिकारी तथा प्राणी क्लेश समितीचे अध्यक्ष व सांगली पोलीस अधीक्षक यांच्याकडे सांगलीतील पिपल फॉर अनिमल्सचे पक्षीमित्र, अॅड बसवराज होसगौडर यांनी हरित न्यायालय व महाराष्ट्र शासनचे परिपत्रकचे प्रत ई-मेल द्वारे तक्रार करून सांगली जिल्ह्यात नायलॉन मांजा विक्रीवर बॅन करावा तसेच मांजा विक्री करणारे लोकांनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.



















