बीड (निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.०१.२०२१
आष्टी- तालुक्यातील वाहिरा येथील वाहिरा ते पिंप्री मार्गाची दुरावस्था म्हणून काही वृतपत्रे चुकीच्या बातम्या देत असुन ते जनतेची दिशाभूल करत आहेत.अशी भूमिका वाहिरा येथील पिडित शेतकऱ्यांनी मांडली आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की, वाहिरा गावातील सर्व्हे नंबर ९८ मधून १९७२ साली दुष्काळाच्या काळा मधे वाहिरा ते पिंप्री असा जिल्हा मार्ग शासकीय कोठ्यामधुन बनविला गेला होता, परंतु सन २०१५ साली शासकीय सेवेत असणारे काही धनदांडगे यांनी मनगट शाहीचा वापर करून बेकायदेशीर रित्या J C B मशीनचा वापर करून बळ पूर्वक अस्तीत्वात असलेला मुख्य रस्ता उखडून काढला व अन्यत्र दुसऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या शेतातून त्यांच्या परवानगी शिवाय वळविला हा रस्ता मयत बबन नारायण पगारे (पत्रकार), सुभाष माधव पगारे (मैनेजर एल.आय.सी.), सदाशिव माधव पगारे(शिक्षक अ.नगर), महादेव सावळा पगारे (सेवानिवृत्त एफ.सी.आय. खाते), आनंद महादेव पगारे(ए.पी.आय.महाराष्ट्र पोलिस), विजय महादेव पगारे (पिंपरी चिंचवड महानगर पालिका), दशरथ सावळा पगारे(खाजगी कर्मचारी), मनोहर सावळा पगारे (खाजगी कर्मचारी), हिरा नारायण पगारे, यमाजी नारायण पगारे, रोहिदास नारायण पगारे या व्यतीनी मनगटाच्या जोरावर अनधिकृतरित्या बनविला आहे. सदर गंभीर प्रकारा बाबत ग्रामपंचायतीसह इतर संबधीत कार्यालयात गरीब, पिडित शेतकरी हिरालाल माणिक पगारे, मल्हारी यंकु पगारे, चरणदास लक्ष्मण पगारे, राजू माणिक पगारे, बापू लक्ष्मण पगारे, किसन माणिक पगारे, या सर्वानी वेळोवेळी तक्रारी दिल्या असल्याची माहिती निर्भीड पत्रकारशी बोलताना दिली आहे.

अशा प्रकारे २०१५ साली वाहिरा ते पिंप्ररी जिल्हा मार्ग सर्व्हे नं. ९८ मधून उखडून बेकायदेशीररित्या वळविला गेला व धनदांडग्यानी संबधीतांची तोडें दाबून मुळ मार्गावर अक्षरशः घरे बांधुन अतिक्रमण केले आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असुन तितकाच धक्कादायक आहे. ग्रामपंचायतीने वेळीच या प्रकाराला रोखले असते तर आज वाहिरा ते पिंप्री रस्त्याची अशी बिकट अवस्था झालीच नसती. या अतिक्रमणास व रस्त्याच्या दुरावस्थेस जितके मयत बबन नारायण पगारे (पत्रकार) , सुभाष माधव पगारे (मैनेजर एल.आय.सी.), सदाशिव माधव पगारे(शिक्षक अ. नगर), महादेव सावळा पगारे (सेवानिवृत्त एफ.सी.आय. खाते), आनंद महादेव पगारे(ए.पी.आय.महाराष्ट्र पोलिस), विजय महादेव पगारे (पिंपरी चिंचवड महानगर पालिका), दशरथ सावळा पगारे(खाजगी कर्मचारी), मनोहर सावळा पगारे (खाजगी कर्मचारी),हिरा नारायण पगारे, यमाजी नारायण पगारे, रोहिदास नारायण पगारे या व्यक्ति जबाबदार आहेत तितकेच वाहिरा ग्रामपंचायत देखील जबाबदार आहे. सदर अतिक्रमण हटवण्यासाठी ग्रामपंचायत वाहिरा यांचेसह जिल्हाधिकारी बीड व अन्य संबंधितांना लेखी अर्ज दि. १०.१२.२०१८ रोजी केला असुन लवकरच अतिक्रमण हटविले जाऊन वाहिरा ते पिंप्री मार्ग सुरळीत चालू होईल अशी आशा हिरालाल माणिक पगारे या शेतकऱ्यासह सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केली असुन ग्रामपंचायतीचे प्रशासनाला दिलेले निवेदन म्हणजे चोराच्या उलटया बोंबा आहेत असे शेतकऱ्यांनी म्हटले असुन ग्रामपंचायतीने तात्काळ रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्ता पुर्वरत करण्या



















