बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३०.०५.२०२१
आष्टी- आदर्श शिक्षक श्री संतोष पनालाल पटवा श्री संतोष पनालाल पटवा यांचा जन्म १ जुन १९६३ रोजी माणिकदौंडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथे झाला. वडिलांचे छोटेसे किराणा दुकान, पाच भाऊ असा त्यांचा मोठा परिवार होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा. शाळा माणिकदौंडी येथे तर माध्यमिक शिक्षण श्री तिलोक जैन विद्यालय, पाथर्डी येथे झाले. त्यांनी सन १९८३ साली इ. १० वी पास झाल्यानंतर अध्यापक विद्यालय, अ.ए. सोसायटीचे अहमदनगर येथे डी.एड. पूर्ण केले. डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण करत असताना कायनेटिक कंपनी अहमदनगर येथे पार्ट टाईम काम केले. जून १९८६ ला आनंद विद्यालय, शिराळ चिचोंडी येथे प्रथम नोकरी केली. २१ जानेवारी १९८७ रोजी सांगवी (पाटण ) केंद्र डोईठाण येथे रुजू झाले. त्यानंतर १०-१०-१९९० ला जि.पा.मा. शाळा टाकळसिंग येथे बदली झाली. टाकळसिंग येथे असताना त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून घडवले. त्यामध्ये विद्यार्थी महेशकुमार शिंदे, डॉ. दळवी, डॉ. नरवडे व अनेक शिक्षक आज आष्टी येथे कार्यरत आहेत.सन १९९६ साली बी.ए. पूर्ण केले. त्यानंतर १९९९ राघापूर सारख्या छोट्याश्या गावात सेवा बजावली. दहा-बारा विद्यार्थी आजही नोकरीला आहेत. पूनम जाधव हि विद्यार्थिनी मुंबई सारख्या ठिकाणी क्लास घेत आहे. त्यावेळच्या अतिशय कठीण काळात त्यांनी सायकलवर प्रवास करून नोकरी केली.२००४ रोजी प्राथमिक बेलगाव, ता. आष्टी येथे आदर्श कार्य केले. त्यानंतर २००५ मध्ये नांदूर येथे सहशिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून आदर्श कार्य केले.
२०११ रोजी पाटोदा तालुक्यातील वैजाळा येथे सरांची प्रशासकीय बदली झाली. लगेच त्याच वर्षी प्राथमिक पदवीधर म्हणून अंभोरा येथे बदली झाली . अंभोरा येथे असताना केंद्रीय मुख्याध्यापक पादाचा कार्यभार अतिशय उत्कृष्टपणे सांभाळला. मार्च २०१३ ला जि.प.प्रा. शाळा धनगरवाडी, केंद्र पिंपळा येथे सरांची बदली झाली. तेथे असताना त्यांनी आदर्श ज्ञानदानाचे कार्य करत खूप विद्यार्थी घडवले. विविध उपक्रम राबवून संगणक, वृक्षारोपण, शाळेची कामान, शाळेचे कंपाउंड, शाळेची रंगरंगोटी, शाळेसाठी पाइपलाइन असे अनेक उपक्रम राबवले. या ३५ वर्षांच्या काळात सरांना २०११ साली स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्थेने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. तसेच शिवशंभो प्रतिष्ठान, अंभोरा यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले. तसेच स्वर्गीय आसाराबाई लोखंडे सेवा प्रतिष्ठान, वाळकी येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. साने गुरुजी सेवा संस्था, आष्टी यांनी आदर्श पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या नोकरीच्या काळात सर्व प्रकारची प्रशिक्षणे त्यांनी पूर्ण केली. तसेच जनगणना, मतदार नोंदणी व सर्व प्रकारची शासकीय कामे त्यांनी उत्कृष्ट पणे पार पाडली. हे काम करताना त्यांनी सर्व शिक्षकांना सतत मदतीचा हात पुढे असायचा. सर्व शिक्षकांना नियमित मार्गदर्शन करत असत. म्हणूनच त्यांना पिंपळा केंद्राचे “भीष्माचार्य” असे संबोधले जात असे. नेहमी आनंदी असणारे, प्रसन्न व्यक्तिमत्व, सतत हसमुख चेहरा, प्रेमळ असणारे श्री पटवा सर आज सेवानिवृत्त होत आहेत. शिक्षक, विद्यार्थी यांना त्यांचे नेहमी मार्गदर्शन लाभत असे. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मा. केंद्रप्रमुख श्री. म्हस्के साहेब, स्वामी विवेकानंद शिक्षक पतसंस्था संचालक श्री. आमले सर व श्री. विठ्ठल शिंदे दादा व त्यांचे सहकारी श्री. सरोदे सर, पिंपळा केंद्रातील सर्व शिक्षकवृंद, धनगरवाडी येथील मा. सरपंच व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने श्री. पटवा सरांना शुभेच्छा देण्यात आल्या.



















