सातारा (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, दि.०१.०६.२०२१
महाबळेश्वर- मार्च २०२० पासुन पर्यटन व्यवसाय पूर्णतः बंद असल्याने गेल्या दीड वर्षापासून महाबळेश्वरचे नागरिक आर्थिक अडचणीचा सामना करीत आहेत.

याची दखल घेऊन महाबळेश्वरच्या गरजु घोडा व्यवसायिकाना जीवरक्षा एनीमल वेलफेयर ट्रस्ट पुणे व जेनिस स्मिथ एनिमल वेलफेयर ट्रस्ट पाचगणी यांच्या वतीने समाजसेवक किरण गोरखनाथ शिंदे यांच्या सहकार्याने मोफत चारा व मोफत लसिकरण करण्यात आले. या प्रसंगी जीवरक्षक एनिमल वेलफेयर ट्रस्ट पुणेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट सुनील कदम,जेनिस स्मिथ एनिमल वेलफेयर ट्रस्ट पांचगणीचे सेक्रेटरी प्रबोध गायकवाड़,रितिका ठाकुर, गौतम कठारे, सूर्यकांत वैराट, अमर घाडगे,हर्षवर्धन खूने, शशी उतेकर ,महाबळेश्वर हॉर्स अँड पोनी असोशिएशनचे अध्यक्ष जावेदभाई खारखंडे,उपाध्यक्ष ताजुद्दीन बड़ाने, सेक्रेटरी इमरान डांगे, शगिरभाई बड़ाने उपस्थित होते. पंचायत समिति प्राणी आरोग्य तज्ञ (एलडिओ) डॉ. जयसिंग सिसोदिया,डॉ. संदीप आरडे यांनी घोड्यांची तपासणी करुन लसिकरण केले. बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक किरण शिंदे,फारुखभाई वारूणकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण शिंदे यांनी केले. या प्रसंगी कोविडच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

अडचणीच्या काळात आपल्यासाठी फूल न फुलाची पाकळी मदत करू शकलो याचे समाधान वाटते असे एडवोकेट सुनील कदम यांनी म्हटले आहे. तर आपण केलेली ही मदत आमच्या जखमेवर फुंकर घालनारी असून आमच्यासाठी बहुमोल असल्याचे जावेदभाई खारखंडे यांनी म्हटले आहे. उपस्थितांचे आभार किरण शिंदे यांनी मांडले.



















