सोलापूर(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.३.०६.२०२१
करमाळा- करमाळा शहर व तालुक्याला कोरोना लसीचा अल्प साठा मिळत असल्याने लसीकरण मोहिमेचा वेग मंदावत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. त्यात करमाळा शहरात हप्त्याला २०० ते ३०० लसींच उपलब्ध होत आहे. लसीकरणाचा वेग जर असाच राहिला तर, तालुक्यात कोरोनाचे संकट अधिक प्रमाणात वाढू शकते,शहरात किमान हप्त्याला १००० लसीं देत, तालुक्यातही साठा वाढवून द्यावा. तसेच कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत तरुणांमध्येही संक्रमणाचे प्रमाण वाढताना दिसते आहे, त्यामुळे आता केवळ ४५ वर्षांवरील नागरिक अशी मर्यादा न ठेवता, १८ वर्षांहून अधिक वयाच्या प्रत्येकाचे लसीकरण करण्याचा व्यापक कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राबवावा. त्याचप्रमाणे फ्रंटलाईन वर्कर म्हणून अत्यावश्यक सेवेतील मेडिकल, पेट्रोलपंप, कृषी दुकानदार, गॅस एजन्सी, रेशन दुकानदार, किराणा दुकानदार, हमाल इ.सेवा देणाऱ्यांना लसीकरणात प्राधान्य देऊन, त्यांना कोरोना संसर्गापासून दूर ठेवता येऊ शकते. अशा मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती राज्यसरचिटणीस, पुजा झोळे यांनी पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्याकडे केल्या आहे.



















