बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०७.०६.२०२१
आष्टी- मागील २० वर्षापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय जनरक्षा महासंघानें कायम समाजातील गोर गरिब,वंचित जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम करत अन्यायग्रस्ता न्याय देत सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याचे काम केले,सतत जनहितासाठी धडपडणाऱ्या आणि कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय जनरक्षा महासंघानें मागील काही दिवसापूर्वी किशोर सापते त्यांची बीड जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती केली होती.निवडीनंतर त्यानीं सामान्य गरजू जनतेला संकट काळात विविध माध्यमातून मदत करत,आधार देण्याचे काम केले. त्यासोबत महासंघाच्या माध्यमातून त्यानीं कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णाला वैद्यकीय सेवा देत असलेले डॉक्टर, आरोग्य सेविका, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, महावितरण कर्मचारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मंडळी यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करत काम करण्याची नवी ऊर्जा आणि बळ दिले, अशा जनहितार्थ समाजकार्यची दखल घेत, राष्ट्रीय जनरक्षा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब आगलावे यांनी किशोर सापते त्यांची बीड जिल्हाध्यक्ष पदासोबत राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करत राज्य पातळीवरील नवी जबाबदारी सोपवली. या केलेल्या कामाची दखल घेत, संघाने एक प्रकारे त्यांना कामाची पोहोच पावतीच दिली म्हणावी लागेल. झालेल्या निवडीचे त्यानीं समाधान व्यक्त केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मिळालेल्या नव्या जबाबदारीं आणि संधीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे विविध क्षेत्राशी निगडित असणारे प्रश्न सोडवत, पदाला न्याय देण्याचे काम करू, असा विश्वास त्यानीं व्यक्त केला.