बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१०.०८.२०२१
आष्टी – नेहमीच सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देत, आपल्या उत्कृष्ट लेखणीच्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमावर मजबूत पकड असणारे, अर्जुन थोरात यांची महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार आणि आऊटसोर्सिंग कामगार अशा दोन्ही युनियनच्या संयुक्त जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी सर्वांनुमते निवड करण्यात आल्याने. त्यांच्या निवडीबद्दल समाधान आणि आंनद व्यक्त करत, त्यांचा दौलावडगाव येथे माजी सभापती अशोक इथापे, माजी सरपंच, संदीप रामगुडे, विलास वायभासे ग्रा.सदस्य गोटीराम कोहोक , मुख्याध्यापक, सुभाष कोहोक, रवी कदम, केशव कराळे जावेद सय्यद, शांतीलाल कोहोक, शिवाजी परभणे मोशीम कुरेशी, आसाराम कोहोक, अंकुश गव्हाणे अधिसह ग्रामस्थमंडळीकडून त्यांना सन्मानित करत, शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी बोलता अर्जुन थोरात म्हणाले की, तांत्रिक युनियनने दिलेल्या पदाला व जबाबदारीं न्याय देण्याच काम येत्या काळात प्रामाणिकपणे करेल, अशी ग्वाही दिली.



















