सातारा (निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२१.१०.२०२१
महाबळेश्वर- तालुक्यातील पार या गावात ग्रामसभेत ग्रामस्थांनी विकासकामांसाठी ग्रामसेवकास प्रश्न विचारला असता मनात राग धरून ग्रामसेवकाने ग्रामस्थांच्या प्रश्नाचे कोणतेच उत्तर न देता व त्यावर कोणतीही कारवाई न करता ग्रामसभा अर्धवट सोडून पळ काढल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , पार या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि.२०.१०.२०२१ रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वीस वर्षांपासून पार पार या गावातील अनुसुचित जातीतील वस्ती मध्ये एकही रुपयाचे काम झाले नसल्याने त्याबाबत मार्ग काढण्यासाठी पार पार या गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेला ग्रामसेवक हे देखील उपस्थित होते. ग्रामसभेस उपस्थित पार पार या गावातील अनुसूचित जातीतील नागरिकांनी विकास कामांबद्दल ग्रामसभेत प्रश्न मांडला असता कोणत्याही प्रश्नाला काहीही उत्तर न देता व कोणतीही कारवाई न करता ग्रामसेवक धुमाळ मिटिंग अधर्वट सोडून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर सदर प्रकाराने ग्रामस्थांचा अपमान झाला असून जबाबदार ग्रामसेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक महाबळेश्वर व गटविकास अधिकारी महाबळेश्वर, तहसीलदार महाबळेश्वर यांच्याकडे लेखी पत्राने केली आहे.

तर एकूणच बौद्ध वस्तीतील कोणतीच कामे जाणीवपूर्वक ग्रामपंचायत करत नसून आमच्या वस्तीमध्ये कोणतेही काम न करता खोटी बिले मात्र मंजूर केली असून या प्रकरणाची चौकशी संबंधितांनी करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.तर सदर घटनेची चौकशी तात्काळ करावी अन्यथा येत्या काळात सदर प्रश्नी राज्यभर तीव्र आंदोलन उभारणार असल्याची माहिती बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण शिंदे यांनी दिली आहे.



















