सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२२.०१.२०२२
खंडाळा- निखिल झगडे मित्रपरिवार आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नायगाव येथे ग्रामपंचायत नायगाव व डॉ.मनोहर डोळे फाऊंडेशन नारायणगाव यांच्या विशेष सहकार्याने पार पडले या शिबिरात नायगाव व परिसरातील नागरिक उत्स्फूर्त पणे सहभागी झाले.
शिबिराचे उद्घाटन नायगाव च्या सरपंच सौ पूनम नेवसे यांच्या हस्ते करण्यात आले या वेळी शिबिराचे आयोजक भाजपा ओबीसी मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश युवक सहसंपर्क प्रमुख व नायगाव चे माजी सरपंच निखिल झगडे, डॉ मनोहर डोळे फाऊंडेशन चे विजय गायकवाड, ग्रामपंचायत च्या सदस्या सौ साधना नेवसे, सौ स्वाती जमदाडे, सौ रेश्मा कानडे, श्री हनुमंत नेवसे, ग्रामसेवक सुनिल कुदळे , भैरवनाथ शिक्षण संस्थेचे सचिव शिदू नाना नेवसे, नायगाव विकास सोसायटी चे चेअरमन तुषार देवडे,भाजपा ओबीसी मोर्चाचे खंडाळा तालुका अध्यक्ष व नायगाव चे माजी ग्रामपंचायत सदस्य मेघनाथ नेवसे , माजी सरपंच मनोज नेवसे,पोलीस पाटील माधुरी नेवसे,श्री सागर कानडे, डॉ. विपूल नेवसे, उमेद अभियान गट प्रमुख सौ.जयश्री जमदाडे, सौ प्रिया कानडे, विलास ननावरे आदी सह ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी निखिल झगडे यांनी प्रास्ताविकात शिबीर आयोजनामागचा उद्देश व शिबिराच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या मोफत सेवांच्या विषयी माहिती सांगितली तर विजय गायकवाड यांनी उपचार पद्धती विषयी माहिती सांगितली स्वागत शिदू नाना नेवसे यांनी केले. तपासणी शिबारा मध्ये ११७ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली त्या पैकी १० जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी नारायणगाव येथे नेण्यात आले. शिबिर यशस्वी होण्यासाठी मेघनाथ नेवसे,जगन्नाथ नेवसे, नंदकुमार सुतार,सुजित नेवसे, प्रसन्न बहिरट,गणेश कांबळे,भारती सातव, संभाजी नेवसे,प्रशांत नेवसे, उदय नेवसे,अभिजित पारखी,सुरेश नेवसे, आशिष जमदाडे, अविनाश पवार, राकेश कानडे आदींनी परिश्रम घेतले.



















