सातरा(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१४.०२.२०२२
महाबळेश्वर- सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे,गोरगरीब जनतेला त्यांचे हक्क मिळावेत म्हणून प्रयत्नशील असणारे, राज्यभर तरुणांचे संघटन निर्माण करून समाजसेवा घडवून आणणारे, बुद्धिस्ट प्रेरणा ग्रुप महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी सामाजिक व धार्मिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,महाबळेश्वर बचाव आघाडीचे प्रमुख, निर्भीड पत्रकार या वृत्तपत्राचे पुणे विभागीय संपादक यांचे जनसंपर्क कार्यालयाचे रिबीन कापून जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मूनवर हौसिंग सोसायटीचे चेअरमन श्री ख्वाजाभाई वारूणकर यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले. त्याच प्रमाणे माजी उपनगराध्यक्ष अफजलभाई सुतार यांचे हस्ते कार्यालयाचे नावाच्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले व किरण शिंदे यांचे कार्यालयास जनता दरबार असे नामकरण करण्यात आले.
•कार्यालयाच्या माध्यमातून महाबळेश्वरच्या जनतेच्या अडचणी,समस्या सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार- किरण शिंदे
सदर कार्यक्रमाच्या वेळी आज संपुर्ण विश्व हे व्हॅलेंटाईन डे साजरा करत असून आपल्या प्रेमाची कबुली देत आहे. मी देखिल आज महाबळेश्वरच्या बाबतीत माझ्या मनामध्ये असलेल्या प्रेमाची कबुली देत असून त्या प्रेमामुळेच आज माझ्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करीत असल्याचे त्यानी उपस्थितांना सांगितले.

•जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते ख्वाजाभाई वारूणकर यांचा त्यांच्या कार्याबद्दल किरण शिंदे यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान

या प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य उदघाटक सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक, मूनवर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन श्री ख्वाजाभाई वारूनकर यांचा किरण शिंदे यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ख्वाजाभाई सारखे मार्गदर्शक आम्हाला कार्य करण्यास प्रेरणा देतात. त्यांनी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी आपले स्वतःचे घर असण्याचे गोरगरिबांचे स्वप्न साक्षात उतरवले आहे. कित्येक गरिबांच्या डोक्यावर त्यांच्यामुळेच छत असून त्यांच्या या कार्याचा आम्ही गौरव करीत असून हा गौरव महाबळेश्वरच्या नागरिकांचा असल्याचे किरण शिंदे यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले. तर सदर सत्काराने भारावून गेलो असून अजून कार्यकरण्याची ऊर्जा मिळाल्याची भावना ख्वाजाभाई यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
•माजी उपनगराध्यक्ष अफजलभाई सुतार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन किरण शिंदे यांच्या हस्ते सन्मान
अफजल भाई सुतार हे तरुणांचे आदर्श असून एक युवा नेतृत्व आहेत. त्यांच्या सोबत कार्य करताना अभिमान वाटतो त्यांच्या कार्याचा सन्मान आज आम्ही करताना आनंद वाटतो असे गौरवोद्गार किरण शिंदे यांनी काढले तर येत्या काळात आपण सोबत मिळून कार्य करून शहराचा विकास करूयात अशी भावना अफजलभाई सुतार यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास अफजलभाई सुतार, ख्वाजाभाई वारूणकर, हॉर्स युनियनचे शगिरबाबा बडाने,ताजुभाई बडाने,नौशाद भाई, टॅक्सी युनियनचे आसिफभाई पटेल,फारुकभाई वारूणकर,गोरखनाथ शिंदे, माजी उपनगराध्यक्षा छायाताई शिंदे,उद्योजक योगेश शिंदे, सागर मोरे, किरण मोरे, रोहन जंगम, दिपक वरपे, यांचे सह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















