बीड(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.०२.०८.२०२२
आष्टी- तालुक्यातील पंचायत समिती होणाऱ्या निवडणुकीमध्ये खडकत गणातून पै. अमोल बबन शिंदे यांना भाजपकडून उमेदवारी देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
खडकत पंचायत समितीसाठी खुला प्रवर्गासाठी सुटला असून चिखली येथील रहिवासी आणि आमदार सुरेश धस यांचे कट्टर समर्थक अमोल शिंदे यांना पंचायत समिती साठी खडकत गणांतुन उमेदवारी देण्याची मागणी खडकत गणातील नागरिकांकडून होत आहे.
अमोल शिंदे हे तरुण तडफदार नेतृत्व असून तळागाळातील लोकांचे प्रश्न त्यांनी स्वतः समोर येऊन पूर्ण केलेले असल्याने सतत लोकांच्या प्रश्नासाठी अग्रेसर असतात.त्यांची सामजिक , राजकीय क्षेत्रात उलेखणीय कामगिरी आहे, नेहमी लोकांच्या सुखदुःखात सहभागी असतात, त्यांचा मोठा मित्र परिवार आहे, शेतकऱ्यांच्या अडचणी वेळी मदतीला धावून जाणारा, अपघाताच्या वेळी मदत करणारा, प्रामाणिकता, खरा समाजसेवक शेतकरी पुत्र कष्टकरी, मजुर, कामगार, यांची अडचण, जाणून घेणारा, युवा फ्रेश चेहरा, उच्चशिक्षित, सर्वधर्म समभाव शिवरायांचा मावळा म्हणुन त्यांची ओळख आपला हक्काचा माणूस म्हणजे पै. अमोल शिंदे गरीब कुटंबांमध्ये जन्मलेला शेतकरी पुत्र शेतकऱ्याच्या मुलांना शिक्षणासाठी काय आडचन, असते स्वतः आनुभव घेऊन त्याच्यावर मार्ग काडणारा, सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन चालणारा, लहान थोर ते वृद्धा ,पर्यंत आपलंसं वाटणार व्यक्तिमतत्व, शाळा, कॉलेज , तहसिल, पंचायत समिती, किंवा कोणतेही सरकारी काम आसो ते पूर्ण करूनच शांत बसणे, सर्व सामान्य जनतेच्या मनातील आपल्या हक्काचा युवा नेता अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.
तसेच गावातील पाण्याचा प्रश्न असो की रस्त्याचा त्यासाठी संघर्ष त्यांनी सतत चालू ठेवलेला आहे नेहमी सामाजिक, धार्मिक कामात अग्रेसर असल्यामुळे त्यांचा खडकत गणामधील परिसरात चांगला दांडगा संपर्क आहे. प्रत्येक व्यक्तीला मदत करण्याची इच्छा व चांगल्या स्वभावामुळे त्यांनी ओळख निर्माण केली असून त्यामुळे खडकत गणातून त्यांना उमेदवारी मिळण्यासाठी जनतेनेच कंबर कसली असून त्यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांसह अमोल राजे शिंदे युवक मंडळाने केली असून आमदार सुरेश धस यांनी पै. अमोल शिंदे यांना पंचायत समिती गणासाठी उमेदवारी देऊन न्याय देतील अशी अपेक्षा व अशा लोकांनी व्यक्त केली आहे.



















