सातारा(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१३.०८.२०२२
पाटण- श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले ने ” राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक ” ( NMMS ) परीक्षा, इयत्ता आठवी साठीच्या या परीक्षेमध्ये सुयश प्राप्त केले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेमध्ये विद्यालयाचे एकूण १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तेजकुमार सिद्धाराम जंगाणी १०८ गुण, कु. चंदना संदीप लोहार ९१ गुण, विनायक गजानन कारळेकर ७१ गुण, जयेश सुरेश निकम ८८ गुण, मयुरेश विकास माने ८० गुण प्राप्त केले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर, संस्थेचे माजी सहसचिव प्रशासन आर के भोसले, संस्थेचे माजी सहसचिव अर्थ एस के कुंभार, संस्थेचे माजी आजीव सेवक श्री.ए पी पाटील यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अशोक माने, अजीव सेवक श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे
अध्यापक वर्गाचे ही अभिनंदन केले. विद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी श्री.शिवाजी सूर्यवंशी, श्री.ताईगडे प्रमोद, श्री.काशीद पी एस, श्री.ताईगडे विलास, सौ.येडगे नीता मॅडम, सौ.पाटील एस डी मॅडम इत्यादी शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.सचिन ताईगडे, तळमावले गावच्या सरपंच सौ.शोभा भूलुगडे, पालक वर्ग व समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.



















