मुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.१.०९.२०२२
जव्हार- नांदगाव ग्रामपंचायत मधील राजेवाडी येथे शहापूर तालुक्यातील ठाकूर समाजाचे प्रमुख कार्यकर्त्यांनी हिरवा देव उत्सवास भेट देऊन हिरवा देवाचे दर्शन घेतले. यावेळी हिरवा देवाची स्थापना कशी करावी? हिरवा देवाची समाप्ती कशी करायची? एकंदरीत सर्व प्रश्नावर ५ तास चर्चा झाली यात प्रत्येक प्रश्नाला उत्तर व मनाचे समाधान होई पर्यंत मार्गदर्शन करण्यात आल. शहापूर तालुक्यातील मालू वाख सर, काथोड खंडवी सर,पारधी सर, खडके सर व शिद सर व शहापूर तालुक्यातील विविध गावचे ४५/५० सहकारी यांनी नांदगाव हिरवा देव उत्सवाला भेट देऊन माहिती घेतली .यावेळी खडके सर व पारधी सर यांनी बोलताना सांगितले की आदिवासी समाज हा निसर्ग पूजक आहे आणि जे डेकोरेशन आहे ते काहीतरी सजावट केली असेल पण या ठिकाणी आल्यावर खरोखर आमच्या मनासारखे आणि पूर्ण सुष्टी या ठिकाणी तयार केली आहे. मालू वाख सर यांनी बोलताना सांगितले की हिरवा देव उत्सव समितीने जी सुरुवात केली आहे ती नक्कीच पुढच्या पिढीला प्रेरणादायी आहे.
यावेळी बहुजन विकास आघाडी जव्हार तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा,हिरवा देव उत्सव समिती अध्यक्ष संजय भला,तंटा मुक्ती अध्यक्ष शंकर झुगरे व नांदगाव ग्रामस्थ उपस्थित होते.



















