रायगड(निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क)प्रतिनिधी, शैलेश ठाकूर
दि.२५.१०.२०२२
उरण- जेएनपीए बंदर परिसरातील करळ उड्डाण पूलावरील वळणावरुन विरोधी दिशेने जाणार्या एन एम एम टी बसने मोटारसायकला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात हा शनिवारी दि २२ सकाळच्या सुमारास घडला आहे
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार करळ उड्डाण पूलावरील वळणावरुन विरोधी दिशेने जाणार्या एन एम एम टी बस गाडीने समोरुन येणार्या मोटारसायकल स्वाराला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघात हा शनिवारी ( दि२२) सकाळच्या सुमारास घडला आहे. या अपघाताची माहिती मिळताच उरण वाहतूक पोलीस शाखेच्या पोलिसांनी सदर अपघात ग्रस्त मोटारसायकल स्वाराला जेएनपीए टाऊनशिप रुग्णालयात दाखल करुन घेतले. परंतु मोटारसायकल स्वाराच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने सदर अपघातग्रस्त मोटारसायकलस्वाराला पुढील उपचारासाठी नवीमुंबई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



















