नवीमुंबई(निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क)प्रतिनिधी,
दि.२३.०७.२०२४
नवी मुंबई- शिवसेना संलग्न शिव चित्रपट सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी चित्रपट निर्माते तसेच नगरसेवक, भाकर, खैरलांजीच्या माथ्यावर, लोकशाही जिंदाबाद अशा विविध चित्रपटात आपली मुख्य भूमिका निभावणारे वीर फिल्म अँड इंटरटेनमेंट कंपनीचे मालक विजय दिवे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार व उपनेते मामाश्री आनंदराव जाधव यांच्या आशीर्वादाने व शिव चित्रपट सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुशांत शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच यावेळी प्रवीण पवार, अशोक शिरोळे, राकेश कदम, तुकाराम उभे या कार्यकर्त्यांचे ही प्रवेश झाले. मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत ज्या कलाकारांवर अन्याय होईल त्या सर्वांना न्याय मिळवून देऊ. कलाकारांचे विविध प्रश्न, समस्या व मागण्या यावर आवाज उठवून त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जाईल अशी प्रामाणिक भावना शिव चित्रपट सेनाचे नवनिर्वाचित महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय दिवे यांनी निर्भीड पत्रकार समोर व्यक्त केली



















