काळेवाडीत नदीत बुडून एकाच मृत्यू…
निर्भीड पत्रकार न्यूज नेटवर्क प्रतिनिधी, जुबेर शेख
दि.२१.०४.२०२६
काळेवाडी- ज्योतिबा गार्डनजवळील पवना नदीमध्ये सुमारे ५० ते ५५ वर्ष वयोगटातील एका अज्ञात व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे.प्राथमिक माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांनी ही घटना लक्षात येताच तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस व आपत्कालीन पथक दाखल होऊन मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.सदर प्रकरणी अधिक तपास सुरू असून, मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, सर्व बाजूंनी चौकशी सुरू आहे.



















