सरपंच मंगेश साबळेवर गुन्हा दाखल…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी, मयुर चव्हाण
दि.१३.०७.२०२६
पुणे – सरपंच मंगेश साबळे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र जनतेच्या मनात काही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. ८ जून रोजी घडलेल्या कथित घटनेचा गुन्हा तब्बल एका महिन्यानंतर, १० जुलै रोजीच का दाखल करण्यात आला? जर गुन्हा नोंदविण्यासाठी पुरेशी कारणे होती, तर तत्काळ कारवाई का झाली नाही? आणि जर नव्हती, तर नंतर अचानक काय बदल झाले?
लोकशाहीमध्ये शासन, प्रशासन आणि पोलीस यांची प्रत्येक कारवाई पारदर्शक, निष्पक्ष आणि कायद्याच्या चौकटीत असली पाहिजे. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होत असेल, तर त्या कारवाई मागील कारणेही जनतेसमोर स्पष्ट झाली पाहिजेत. कोणताही नागरिक कायद्यापेक्षा मोठा नाही, पण कोणालाही कायद्याचा वापर करून विनाकारण लक्ष्य केले जात आहे, अशी शंका निर्माण होणार नाही याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
सत्य काय आहे, हे न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होईल. पण लोकशाहीत प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही; तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे.
जनतेचा विश्वास टिकवायचा असेल, तर न्याय केवळ झाला पाहिजे असे नाही, तर तो होताना दिसलाही पाहिजे असे मत सर्वसामान्याकडून व्यक्त केले जात आहे.



















