तहसीलदार प्रशांत पाटील मुख्यालयी राहत नसल्यामुळे तात्काळ कारवाई करा, ॲड क्षीरसागर यांची विभागीय आयुक्तांकडे तक्रार…
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.२७.०८.२०२६
संग्रामपुर- संग्रामपूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रशांत पाटील हे मुख्यालयी निवासी न राहता जळगाव जामोद येथून अप डाऊन करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी ॲडव्होकेट गणेश क्षिरसागर यांनी गुरुवारी अमरावती विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली.
सदर दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की, तहसीलदार प्रशांत पाटील हे मुख्यालयी निवासी राहत नसून दररोज जळगाव जामोद येथून अपडाऊन करतात.
तहसीलदार हे पद तालुक्याचे अतिशय महत्त्वाचे पद असून सदर अधिकाऱ्याने मुख्यालय राहणे शासन नियमानुसार आवश्यक व गरजेचे आहे.
संग्रामपूर येथे तहसीलदार यांच्याकरिता निवासस्थान उपलब्ध असून त्या ठिकाणी न राहता तहसीलदार प्रशांत पाटील हे अपडाऊन करीत आहेत . त्यामुळे तात्काळ कारवाई करून तहसीलदार प्रशांत पाटील यांना संग्रामपूर मुख्यालय राहण्याबाबत आदेशित करावे असे तक्रारी नमूद आहे.
तसेच या आधी सुद्धा तहसीलदार प्रशांत पाटील हे अवैध रेती उत्खनननाला अभय देत असल्यामुळे तहसीलदारावर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे बऱ्याच वेळा तक्रारी व निवेदने दीलेले आहेत . परंतु तक्रारी झाल्यानंतर सुद्धा प्रशासन तहसीलदार प्रशांत पाटील यांच्यावर कारवाई करीत नसल्यामुळे नागरिकाचा संताप प्रशासना विरोधात वाढत आहे.



















