प्रतिनिधि.
ऊसतोड़ कामगार यांचे मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे – दत्ता कांबळे
१४/०४/२०१८शनिवार रोजी कर्मवीर ॲड.एकनाथ आव्हाड साहेब प्रणित मानवी हक्क अभियान ऊसतोड़ कामगार संघटनेच्या वतीने आज रोजी मौजे कामथी तालुका कराड येथील शिवारात अभियान प्रणीत ऊसतोड कामगार संघटनेच्या अभियानचे माजलगावचे युवा नेते सुनिल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अभियानचे नेते दत्ता कांबळे हे होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगीबोलताना दत्ता कांबळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की ऊसतोड कामगारांच्या ऊसतोडण्याच्या ठिकाणावर जयंती साजरी करण्याचा एकमेव उद्देश हा ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा असून डॉ .बाबासाहेब यांना अपेक्षित असे डॉ.मिलिंद आव्हाड यांचे समाज निर्मितीचे ध्येय परिपूर्ण करण्यासाठी फुले , शाहू , अण्णाभाऊ यांच्या परिवर्तनवादी विचाराला अनुसरून केलेला एक प्रामाणिक प्रयत्न आहे व त्याच बरोबर भारत देशात १२७ वर्षातील ही जयंती म्हणजे ऊसतोड कामगार यांनी ऊसाच्या फडात साजरी केलेली ही एकमेव पाहिलीच जयंती असावी असा विश्वास व्यक्त केला त्याच बरोबर देशाच्या इतिहासाने याची नोंद घ्यावी असे आव्हान केले.यावेळी मानवी हक्क अभियानचे अशोक कांबळे, आंशिराम कांबळे, महादेव मेंडके , अशोक शेंडगे , कल्याण कांबळे, बिपिन जाधव , मेसबा पाटूळे , धर्मराज लोखंडे व आदि महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.



















