उस्मानाबाद,प्रतिनिधी
हावरगांव मध्ये नेमकं काय?घडलं…
विश्वरत्न महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती. जयंती उत्सव समितीने ग्रामपंचायतीकडून गावातील टावर व मिरवणूकीच्या प्रमुख मार्गावरील पोल वरती निळे झेंडे लावण्याची रितसर नाहरकत (परवानगी) घेतली होती त्यामुळे जयंती उत्सव समितीने सर्व ठिकाणी निळे झेंडे लावले होते.ते निळे झेंडे गावातील गावगुंड पंढरी कोल्हे व त्याच्या सहका-यांनी काढून टाकले त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला. गावातील नागरिकांनी लगेच मिंटीग घेऊन आज यांच्या जयंतीची मिरवणूक कशी निघते तेच आपण बघू !जयंती उत्सव समितीने मिरवणूकीसाठी लागणारा ट्रॅक्टर व पिण्याच्या पाण्याचे जी आर यांना आधीच पैसे दिले होते तो ट्रॅक्टर वाला व जी आर वाला यांना गावातील नागरिकांनी सांगितले की तुम्ही आजिबात गावात यायचे नाही !परंतु भिमसैनिकांनी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढलीच .जे भिमा कोरेगाव मध्ये घडलं तेच हावरगाव मध्ये गावातील नागरिकांनी सर्व दुकाने घरे बंद करून या लोकांना काहीच मिळू देयचे नाही असे म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या मिरवणूकीवर बहिष्कारचं टाकला!जयंतीची मिरवणूक संपवून खोंदला ता.कळंब येथील भीम सैनिक सचिन सावंत ,सखाभाऊ सावंत ,पियुष सावंत ,जीवन सावंत ,संजय सावंत हे दोन मोटारसायकल वरून गावाकडे निघाले असताना रात्री 11 च्या सुमारास खोंदला पाटीनजीक आले असता त्या ठिकाणी हावरगाव मधील 45/50 जणांच्या जमावाने तुफान दगडफेक केली त्यात हे सर्व जण जखमी झाले आहेत जे गंभीर जखमी आहेत त्यांचावर लातूर येथील आश्विनी रूग्णालयात उपचार सुरू आहेत मंगळवार दि.1 मे दिवशी सचिन सावंतच्या तक्रारीवरून हावरगाव मधील 46 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत व पुढील तपास कळंबचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे हे करत आहेत.या बाबत निर्भिड पत्रकार प्रतिनिधी हावरगाव मधील समाज बांधवांनसोबत सविस्तर चर्चा केली असता 60/70 महिलांनी सांगितले की गावातील लोक आजही आमची छेडछाड करतात आम्हाला लज्जा वाटेल असे अश्लील बोलतात ! घरी येऊन धमक्या देतात नव्हे तर मारतात ही! या वेळी भीम आर्मीचे प.महाराष्ट्र संघटक तथा उस्मानाबाद जिल्हा प्रभारी उत्तरेश्वर कांबळे यांनीही भेट दिली असून आमच्या माता भगिनींना व बंधूंना जो पर्यंत न्याय मिळत नाही व त्या जातीयवादी लोकांना कठोर शिक्षा मिळत नाही तो पर्यंत भीम आर्मी लढत राहणार .कांबळे स्वतः पोलिस अधीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या कडून हावरगाव प्रकरणी अपडेट घेऊन व लक्ष ठेवून आहेत !एकाही जातीयवादी नराधमांना आम्ही सोडणार नाहीचं…. असेही कांबळे म्हणाले.



















