प्रतिनिधी. कराड.
युवा नेतृत्व मा.निखिल दादा शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न.
संघटन कौशल्य, उत्तम निर्णय शक्ती, स्वावलंबन, दृढ निश्चय आणि समाजसेवा या सर्वांचा संगम म्हणजेच मा.निखिल दादा शिंदे. आमदार बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय व यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचे पाईक म्हणून ओळखले जाणारे निखिल दादा शिंदे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने सैदापुर (विद्यानगर)येथील त्यांच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.
एका सर्व-सामान्य कुटुंबात जन्म घेऊन लहानपणा पासुनच मोठे होण्याचे व समाजसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांचा प्रवास सुरु झाला. दादांनी प्राथमिक शिक्षण वारणानगर येथील गुरुकुल संस्थेत पुर्ण केले व पुढिल उच्चमाध्यमिक शिक्षण S.G.M.कराड येथे पुर्ण करुन कराड येथील P.C.P.K. येथून त्यानी इंजीनिअर हि पदवी मिळवली. आणि दादांनी त्यांचा स्वतः चा व्यावसाय सुरु केला. व्यावसायात गरुडझेप घेत असतानाच कराड तालुक्यातील युवकांना सोबत घेऊन संगोपन फाऊंडेशन नावाची एक सामाजिक संस्था स्थापन करून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, व्यसन मुक्ती, युवकांनचे प्रबोधन अशा अनेक कामातून त्यांचे सामाजिक काम करने सुरु आहे. त्यांच्या सामाजिक कामांमुळे सातारा जिल्हात निखिल दादा शिंदे यांच्या विचारांची हजारो युवकांची फळी तयार झाली आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या मार्फत तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व लोकांच्या विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत.
निखिल दादा शिंदे यांना दुरध्वनी वरुन कराड उत्तरचे आमदार मा.बाळासाहेब पाटील, मा.जयंत काका पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तर युवा नेते मा. सागर दादा पाटील, नगरसेवक सौरभ पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. अविनाश माने, मा. बाबासो पवार ( माजी उपसरपंच शहापूर ) मा.धिरज जाधव (ग्रा.सदस्य वाघेश्वर) सुरज पाटील, निलेश गुप्ता, महेश भोसले, प्रमोद बोराटे, अजय कदम, ऋषभ डुबल, विक्रम नलवडे, संकेत मुगूलखोड, हिम्मतराव पाटील, अमित ताटे, श्रीधर कदम इत्यादी शेकडो युवकांनी प्रत्यक्ष भेटून दादांना वाढदिवसाच्या शूभेच्छा दिल्या.



















