आष्टी, प्रतिनिधी.अमोल साखरे
तालुक्यातील कासारी येथील शेतकरी शिवाजी पोपट गिरी वय ४० यांचा भरदुपारी एक वाजण्याच्या सुमारास खून करण्यात आला. शिवाजी गिरी हे आपल्या घराजवळ जनावराच्या गोठ्यात असताना आरोपी गणेश लक्ष्मण पूरी व त्यांची पत्नी तिथे आल्यावर गणेश याने अचानक शिवाजी यांच्यावर गुप्तीने वार केले. ही घटना अचानक घडत असताना गणेशची पत्नी रोकण्याचा प्रयत्न करत होती मात्र तिला प्रतिकार करत शिवाजीवर वार केले.आणि यातच शिवाजीचा मृत्यू झाला.हा खून फक्त दोन हजार रूपयेच्या वादतुन झाल्याची चर्चा परिसरा मधे सुरु आहे. घटनेचा पंचनामा केला असून मयताचे सासरे बुवासाहेब रामभाऊ बन यांच्या फिर्यादी वरुन आष्टी पो.स्टे. मधे गणेश पूरी व त्यांच्या पत्नीने संगनमताने खून केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेतील आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहे.



















