सातारा, प्रतिनिधि सागर पाटिल
आज स्वाभीमानीच्या वतीने लोकसभेचे व राज्यसभेचे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्ती व शेतीमालाला हमीभाव याविषयी खास अधिवेशन बोलवावे या विषयीचे जिल्ह्याधिकाऱ्यांना सातारा जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांच्या सहीचे निवेदन देण्यात आले. देशातील शेतकऱ्यांचे वाढते आत्महत्याचे प्रमाण लक्षात घेता सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घेणे आवश्यक आहे. परंतु शेतकरी रक्षणासाठी हवी तेवढी उपाययोजना करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी खासदार राजु शेट्टि देशभर बैठका घेऊन शेतकरी संघटनांच्या नेत्यांची मोट बांधत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांनी लोकसभा व राज्यसभेचे आधिवेशन शेतकऱ्यांसाठी बोलवावे, व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळण्याचा आधिकार व शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित किमान दिड पट हमीभाव मिळण्याचा आधिकार. याविषयी खास अधिवेशन बोलवावे या आशयाचे पाच हजार शेतकऱ्यांच्या सहीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे, कामगार नेते अनिल बापू घराळ, धनंजय महामुळकर, नितीन यादव, लालासाहेब साळुंखे, शंकर चव्हाण, आनंदा शिंदे बापु इत्यादी शैकडो शेतकरी उपस्थित होते.



















