निर्भिड पत्रकार,प्रतिनिधि – नितिन फडतरे पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अंतर्गत कार्यालयीन कामकाज व नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे कामकाज जरी मराठी भाषेतून होत असले तरी आर.टी.ओ.च्या ऑनलाईन अर्ज भरण्याची वेबसाईट वरील प्रक्रिया मात्र इंग्रजी मधूनच सुरू आहे. शासनाच्या योजंनांची माहिती जनसामान्यांना देताना वा त्यासंदर्भात सर्वसामान्याशी चर्चा करताना आणि दूरध्वनी वर बोलताना आर.टी.ओ मधील सरकारी बाबु मराठीचा वापर करत आहेत. तसेच प्रशासकीय अधिकारांच्या बैठकामधेही मराठीचाच वापर होत आहे. त्याचबरोबर रिक्षा चालक, कॅब चालक,यांना बॅच देतांना चालकाला मराठी भाषेचे नॉलेज अवगत असल्याशिवाय बॅच दिला जात नाही. मात्र ऑनलाईन अर्ज, नोंदणी प्रक्रियेदरम्यानच इंग्रजी भाषेचा वापर करावा लागत आहे. ऑनलाईन प्रक्रिया जर मराठीत झाली तर त्याचा सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे



















