निर्भिड पत्रकार
चंद्रपुर प्रतिनिधी, प्रतिक नळे
दिनांक ०८/०६/२०१८
बहुजन रिपब्लीकन सोशालीस्ट पार्टी च्या वतिने शेतकऱ्याच्या मुलभुत समस्यांन सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोर धरणे आंदोलन करण्यात आले.या प्रसंगी बोलतांना बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे म्हणाले की ,महाराष्ट्र सरकार जाणिवपुर्वक शेतकर्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करत आहे .विकासाच्या नावाने खोटी जाहीरातबाजी करणाऱ्या पालकमंत्र्याने चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी आजपर्यंत काय केले ? ते जाहीर करावे असे आवाहन केले.शेतकरी बांधव आज मोठ्या आर्थिक अडचणीत भरडला जात आहे. कित्येक वर्षापासुन शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमीनीला कांग्रेस, बिजेपी च्या सरकारने पट्टे देण्याचे नाकारले आहे. आजघडीला माझी जमीन जबरदस्तीने घेतली जाईल या दहशती खाली शेतकरी जगत आहे .हे शासन जबरदस्तीने शेतकऱ्यांची जमीन हिसकावन्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. तरी जबारनजोत शेतकऱ्यांना कायमस्वरुपी पट्टे द्यावे. राज्यातील शेतीविषयक धोरण ,सरसकट कर्ज माफी करावी,शेतपिकाला हमीभाव च्या दुपट भाव द्या,शेतकरी आत्महत्या ,जमीन वाटप,गायरान जमीनीचे प्रश्न राज्यातिल ४१ ,७३, ७०१ भुमिहीन शेत मजुरांचे प्रश्न ,शेती व शेततळी यांचेशी सबंधीत प्रश्न, स्वामीनाथन आयोग लागु करण्याचा प्रश्न असो सरकार शेतकरी बांधवांबद्दल दुजाभाव करतांना दिसत आहे.शेतकरी राजा आयुष्यभर राबुन जगाचे पोट भरतो त्याच बळीराजाला आयुष्याच्या शेवटी दोन घास खायला मिळत नाही ही आजची परिस्थीती आहे. त्या माझ्या बळीराजाला किमान वयाचे ६० वर्षानंतर मासिक ५००० रु. पेंशन देण्यात यावी.गोसेखुर्द धराणाची पाण्याची व्याप्ती वाढवुन चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे. तसेच इतर जलसाठ्यातुन पाणी मुबलक उपलब्ध करु देण्यात यावे.शेतकऱ्यांची कृषीबिल माफ करावे व निशुल्क नविन कृषी विजजोडनी करुन द्यावी. शेतकऱ्यांच्या मुलांना विनाअट कर्ज उपलब्ध करुन देण्यात यावे व योग्य बाजारपेठ तयार करावी . किटकनाशकामुळे मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला १० लाख रुपये स्वानुग्रह निधी देण्यात यावा व सबंधीतावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. जमीन हद्द शासनाने त्वरीत मोजुन ती कायम करावी अशा विविध मागण्या घेऊन बिआरएसपीचे विदर्भ प्रदेश महासचिव यांच्या नेत्रुत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. जर ह्या मागण्या पुर्ण झाल्या नाही तर तिव्र आंदोलनाचा इशारा झोडे यांनी दिला. धरणे आंदोलनात प्रमुख उपस्थीती संजय मगर बिआरव्हीएम विदर्भ संयोजक,संजय बोधे लोकसभाध्यक्ष चंद्रपूर,मोनल भडके,अजय लिहीतकर,राजु रामटेके,महेंन्द्र झाडे,संजय वानखेडे,संपत कोरडे,रुषी पेटकुले,.संजय भडके,अमित नळे,मितवा पाटील,जिवने ,खोब्रागडे,
चंद्रकांत माझी तसेच असंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थीत होते.



















