निर्भिड पत्रकार
पाटण प्रतिनिधी, अनिल माने
महाराष्ट्रात सुरू असलेल्या क्रुर घटना या मानवतेच्या द्रुष्टीने अतिशय निंदनिय आहे .अशाच काही घटना जि.जळगांव ता.जामणेर येतील वाकडी गावात विहिरीत आंघोळ केल्याच्या कारणांमुळे मातंग समिजातील मुलांना नग्न धिंड काढून मारहाण केली,त्याचबरोबर पूणे पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलीवर खराळवाडीतील भागवत गीता मंदिरातील गाभाऱ्यात झालेला बलात्कार ही दोन्ही क्रत्ये माणुसकीला काळीमा फासणारी असुन या दोन्ही घटनातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी तसेच अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशिच झाली पाहिजे अशी मागणी विविध संघटना कडुन केली आहे.घटनेच्या निषेधार्थ प्रा.पाटील मँडम यांनी लोकशाहीच्या स्वतंत्र भारतात स्त्रीया अजुन अस्वातंञ आणि असुरक्षित आहेत त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते भरत कूराडे हे म्हणाले आंतापर्यंत सहन केले आहे इथुन पुढे कसलाही आत्याचार सहन केला जानार नाही. या ठिकाणी आनंदा टोळे,गणेश नायकवडी,मधुमिता पाटील,पूजा भिसे विजय साळुंखे रमेश उमापे शाहिद शेख संतोश भिसे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.



















