निर्भिड पत्रकार
पाटण प्रतिनिधी, पांडुरंग लोहार
पाटण तालुका पत्रकार संघाचा मेळावा सूसंवाद कार्यालयात मोठ्या ऊत्साहात पार पडला.या मेळाव्यात पारंपरिक राजकीय विरोधक आमदार शंभूराजे देसाई व माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर तसेच राज्यपाल निवास पाटिल हे एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले पहाव्यास मिळाले एवढेच नाहीतर एकमेकांशी हितगुज करताना पाटणच्या जनतेला पहाव्यास मिळाले. राजकीय टिकेची एकही संधी न सोडणारी हि मंडळी एका व्यासपीठावर बघून अनेकाच्या भूवया ऊचावलया होत्या पण निमित्त होत पत्रकार संघाचा मेळावा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पत्रकार संघाचे अध्यक्ष व पूरसकार मिळालेले तालुका संघ यावेळी उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातील अध्यक्षांनी आपले मनोगत मांडले सातारा जिल्हा अध्यक्ष तसेच हरीष पाटणे यांनीही आपले पत्रकांराविषयी आपले विचार मांडले राजकीय नेत्यांनी आपल्या भाषणात पत्रकारीतेमूळे आपण कसे निवडणुकीत निवडून येतो हे सांगितले. आमदार शंभूराजे देसाई यांनी पाटण तालुक्याच्या विषयावर विचार मांडले. यावेळी पाटणतालुक्याच्या पत्रकार संघाने याविषयी अगोदर जर याविषयी आम्हाला कल्पना दिली असती तर आजून छान कार्यक्रम करता आला असता असे सांगितले. तर राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी पत्रकारीता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे हे सांगत पत्रकार किती महत्वाचे काम करतोया विषयी आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पाटणतालुक्यातील सर्व पत्रकार व पाटण तालुका पत्रकार संघाने अचूक नियोजन केल होते.कार्यक्रमाचे स्वागत व आभार पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री शंकर मोहिते यांनी केले.या कार्यक्रमासाठी तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे कार्यकते सामाजिक कार्यकर्ते शैक्षणिक क्षेत्रातील आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



















