तेल्हारा येथे लोककवी वामनदादा कर्डक जयंती उत्साहात
समता कला मंचच्या वतीने अभिवादन; मान्यवरांची उपस्थिती
निर्भीड पत्रकार न्युज नेटवर्क
प्रतिनिधी,
दि.१६.०८.२०२०२६
तेल्हारा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात समता कला मंचच्या वतीने लोककवी वामनदादा कर्डक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी वामनदादा कर्डक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन आघाडीचे तेल्हारा तालुका अध्यक्ष अशोकभाऊ दारोकार होते. यावेळी समता कला मंच तसेच अखिल भारतीय न्याय हक्क समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणातून अशोकभाऊ दारोकार यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक प्रबोधनाच्या कार्याचे महत्त्व विशद केले. वामनदादांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, शोषित घटकांच्या प्रश्नांना आवाज दिला, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शेषराव वाकोडे, बाळासाहेब बोदळे, ग्रंथ मित्र कविवर्य रामेश्वर पोहेकर, शाहीर सदानंद मोरे, ह.भ.प. बाळकृष्ण महाराज वाकोडे, संघपाल दामोदर, प्रकाश बोदळे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समता कला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन समता सांस्कृतिक कला बहुउद्देशीय संस्था, गाडेगावचे अध्यक्ष रविंद्र विरघट यांनी केले.



















