चंद्रपूर प्रतिनिधी, विपीन भालेराव
मूल शहरातील गरीब व अतिक्रमणधारक जनतेला पट्टे मिळावे या प्रमुख मागणीसाठी मूल शहर विकास क्रांती दलाच्या वतीने मंगळवारी मूल नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात आला.मूल शहरातील अनेक लोकांनी शासकीय जागेवर घराचे बांधकाम केले मात्र नगरपरिषदेने त्या सर्व लोकांना पट्टे न दिल्यामुळे येथील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना या सारख्या सरकारी योजनाचा लाभ घेता येत नाही. ज्यांनी घरासाठी सरकारी जागेवर अतिक्रमण अशांना जागा नियमित करून त्यांना तातडीने मालकी हक्काचे पट्टे द्यावे व त्यांना शासकीय योजनाचा लाभ घेता यावा या प्रमुख मागणीसाठी मूल शहर विकास क्रांती दलाच्या वतीने न.प. मूल धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ता ऍड.आश्विन पालिकर, विवेक मुत्यालवार , अमित राऊत , सचिन बोर्डावार, पंकज महाजनवार , किसन शेरकी उपस्थित होते.



















